भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं कौतुक केलंय; "महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख ते परिस्थिती व्यवस्थित हाताळत असल्याचं मला दिसतंय.

महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख म्हणून मी उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देई. ते परिस्थिती व्यवस्थित हाताळत असल्याचं मला दिसतंय. टीका-टिप्पणी करण्यापेक्षा सूचना करणं हे आता माझं कर्तव्य वाटत आहे," 


"मुख्यमंत्री कसा असावा, त्याने कपडे कसे परिधान करावे, त्याची बॉडी लँग्वेज काय असावी, त्याने किती व्यक्त व्हावं, त्यांनी सतत दिसावं याविषयी लोकांच्या कल्पना असतात. त्याच्यापेक्षा ते थोडे वेगळे दिसतायत हे मात्र नक्की. त्यांचा पेहराव किंवा ते सोशल मीडियावर स्वतः फार अॅक्टिव्ह नाहीत, पण CMO अॅक्टिव्ह आहे. देवेंद्र फडणवीस स्वतः सोशल मीडियावर अॅक्टिव्ह होते. ते स्वतः ट्वीट करायचे. पण उद्वव ठाकरेंचा कल वेगळा दिसतोय. मला वाटतं ते एक नवीन पायंडा पाडू शकतात. मी त्यांना पूर्ण पाठिंबा देईन कारण लोकांना त्रास होऊ नये म्हणून त्यांची चांगलं काम करावं असं मला वाटतं."


आताची परिस्थिती ही फक्त महाराष्ट्रावर वा उत्तर प्रदेशवर आलेली नसून जगावर आलेली आहे. आणि आता जग हे एक 'कम्युनिटी' झालंय. अमेरिकेची गरज पूर्ण केली म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्वीट करून मोदींजींचे आभार मानले आहेत. हे यापूर्वी आपण पाहिलं नव्हतं. आतापर्यंत आपल्याला काही हवं असल्यास आपण जगाकडे बघत होतो. पण आता आपण सगळे किती छोटे आहोत, हे जाणवतं. म्हणून आता उद्धव ठाकरेंनी असं का केलं, त्या पक्षाने असं का केलं अशा दृष्टीने बघणार नाही," असं पंकजा मुंडेंनी सांगितलं, सध्याच्या परिस्थितीत आपण सगळ्या गोष्टींकडे सकारात्मक दृष्टीने पाहत असल्याचं पंकजा मुंडेंनी सांगितलंय. त्या म्हणाल्या, "मी याकडे पक्षाच्या दृष्टीतून पाहत नाही. मला वाटतं आता जे चालू आहे ते चांगलं चालू आहे आणि त्यासाठी आपण सहकार्य केलं पाहिजे आणि जे वाईट चालू आहे त्याच्यावर बोट दाखवलं पाहिजे. परिस्थिती आटोक्यात आणण्याचे सध्याचे प्रयत्न ठीक आहेत, त्याच्यासाठी आम्ही त्यांना सहकार्य करू.


Popular posts
कोरोना महासंकट : मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद; अवघ्या ५ दिवसात 'कोविड योद्धा'साठी २१ हजार अर्ज
भारतातील १८ कोटी ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी घ्यावी असा केंद्राचा सल्ला
भारताने दिला मदतीचा हात, अमेरिका आणि बाकी देशांना पण हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन औषध देणार.
राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत एक महत्वपूर्ण निर्णय; उद्धव ठाकरें यांच्या मुख्यमंत्रिपदावरील संकट टळले