राज्यावर आलेल्या कोरोनाच्या संकटाच्या काळात राज्याचे नेतृत्व करत असलेल्या मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पदावरील तांत्रिक संकट अखेर दूर झाले आहे. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना उद्धव ठाकरे हे कुठल्याही सभागृहाचे सदस्य नसल्याने सहा महिन्यांच्या आत दोन्हीपैकी एका सभागृहाचे सदस्य म्हणून निवडणून येणे आवश्यक होते. मात्र कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य विधान परिषदेची निवडणूक लांबणीवर टाकण्यात आल्याने विधिमंडळाच्या कुठल्याही सभागृहाचे सदस्य नसलेल्या उद्धव ठाकरे यांच्या पदावर तांत्रिक संकट निर्माण झाले होते. मात्र राज्य मंत्रिमंडळाने आज झालेल्या बैठकीत एक महत्वपूर्ण निर्णय घेत हे तांत्रिक संकट दूर केले.
राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत एक महत्वपूर्ण निर्णय; उद्धव ठाकरें यांच्या मुख्यमंत्रिपदावरील संकट टळले